Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
13.1K subscribers
1.86K photos
25 videos
361 files
2.81K links
✅ शासकीय योजना

✅ पीकविमा, अनुदान

✅ कुसुम, मुख्यमंत्री सोलर

✅ कर्जमाफी,CSC माहिती
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

https://www.youtube.com/@marathitechmitra?sub_confirmation=1

Affiliate Discloser:https://t.me/marathitechmitra/1644
Download Telegram
📢 निवृत्तीवेतन धारकांसाठी महत्त्वाची अपडेट: ऑक्टोबर २०२६ च्या पेन्शन वाटपात तांत्रिक अडचण!

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या माहे ऑक्टोबर २०२६ च्या लाभाच्या रकमा वितरित करताना महा-डीबीटी (MahaDBT) पोर्टलवर खालील गंभीर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत:

१. खाते क्रमांक अदलाबदल (Account Interchange): महा-डीबीटी पोर्टलवर संजय गांधी निराधार योजनेचे बँक खाते क्रमांक हे श्रावण बाळ योजनेच्या खात्यांवर दिसत असल्याने चुकीच्या खात्यावर रक्कम जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२. XML फाईल डुप्लिकेट जनरेट होणे (Duplicate XML): एकाच लाभार्थ्याची फाईल दोन वेळा जनरेट होत असल्याने, एकाच महिन्यात दोनदा पेन्शन (Double Payment) जमा होण्याची शक्यता आहे.

या तांत्रिक त्रुटींमुळे चुकीचे वाटप किंवा शासकीय निधीचा अपव्यय टाळण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय, पुणे यांनी शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे.

त्यामुळे पेन्शन खात्यात जमा होण्यास थोडा विलंब होऊ शकतो किंवा पडताळणीनंतरच अचूक रक्कम जमा केली जाईल.

📌 माहिती उपयुक्त वाटल्यास गरजू लाभार्थी आणि नागरिकांपर्यंत नक्की शेअर करा!

---

#SanjayGandhiNiradharYojana #ShravanBalYojana #MahaDBT #MaharashtraGovt #PensionUpdate
❤1