नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from Vinayak Bhise
काळजी करावी त्याची,
जो आपली काळजी करतो.
प्रेम करावं त्याच्यावर,
जो आपल्यावर प्रेम करतो.

बोलावं त्याच्यासोबत,
जो मन लावून ऐकतो.
अपेक्षा ठेवाव्या त्याच्याकडून,
जो त्या पूर्ण करतो.

भेट घ्यावी त्याची,
ज्याला भेटून आनंद वाटतो.
वेळ द्यावा त्याला,
जो आपल्याला वेळ देतो.

कदर करावी त्याची,
जो आपल्याला गमावू नये
म्हणून जगतो.
हसावं त्याच्यासोबत,
ज्याचं हास्य अश्रू विसरवतं.

स्वप्न रंगवावं त्याच्यासोबत,
जो आपल्या प्रत्येक स्वप्नाला
आपलं समजतो.
आणि साथ द्यावी आयुष्यभर,
जो आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतो त्याला.

✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
❤8
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
शिक्षक दिनानिमित्त आज माझा हा लेख प्रकाशित झाला नक्की वाचा 🎯🎯
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🫡🇮🇳"ये दील मांगे मोर"🇮🇳🫡(नक्की पूर्ण वाचा)

सलाम त्या मातेला जिच्यापोटी आणि तिच्या त्यागाला जिच्यापोटी देशासाठी हसत हसत प्राण अर्पण करणाऱ्या पुत्राचा जन्म झाला🇮🇳🫡आज 9 sep देशासाठी शेवट्याच्या श्वासापर्यंत देशाची भक्ती अंगात संचारलेल्या कॅप्टन विक्रम बत्रा ह्यांच्या जन्मदिवस🇮🇳☺️ हिमाचल प्रदेशातील छोट्या खेडेगावापासून ते कारगिल युध्दातील विजयाचा पॉईंट 5140 पर्यंतच्या त्यांचा राष्ट्रभक्तीचा🇮🇳,त्यागाचा प्रवास सर्वसामान्यांना जगायला आणि देशासाठी कस लढायला शिकवतो.त्यांच्या बलिदान आणि कार्य नेहमी देशभक्तीस तात्यांना प्रेरणा देते🫡🇮🇳थोड दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटत की आभासी चित्रपटातील कलाकारांना जेवढे महत्व दिले जाते तेवढेच महत्व ह्या भारतमातेसाठी🇮🇳 व इथिल समाजासाठी जीवन वेचणाऱ्या राष्ट्रभक्तानांही देऊ तेव्हा खऱ्या अर्थाने देशात राष्ट्रभक्ततिची बीजे पेरले जातील🤝.त्यांच्या संघर्षाच्या यशोगाथा आणि वारसा जपून ठेवला हीच त्यांच्या बलिदानप्रती मानवंदना असेल..सलाम त्या विरास,त्यांच्या देशभक्तीस..🔥🇮🇳
..🦋🌺😇💞..
शब्दांकन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id-
@Bskendre5
Cont-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा
❤2
Forwarded from Vinayak Bhise
थांब ना रे जरा,
जीवन संपवणं इतकं स्वस्त नाही,
आज दुःखाचं ओझं जड वाटतंय,
पण अजूनही मार्ग बंद नाहीत

तू एकटा नाहीस,
तुझ्या वेदना ऐकायला
अजून कान आहेत

अश्रू पुसायला
अजून हात आहेत
सदैव साथ देणारी
हक्काची माणसं
आजही तुझ्यासोबत
उभी आहेत

लक्षात ठेव
मरण शांतता नाही देणार,
पण तुझं जगणं
एखाद्यासाठी प्रेरणा ठरणार

फक्त एक फोन कर,
एक संवाद साध,
एक दीर्घ श्वास घे,
आणि स्वतःला हळूच सांग
“मी महत्त्वाचा आहे…
माझं जगणं आवश्यक आहे”

हो…
या दुःखावर मी मात करू शकतो,
या अंधारातून मी बाहेर पडू शकतो

आत्महत्या हा शेवट नाही,
तो फक्त मनावर आलेला
क्षणिक अंधारलेला विचार आहे


✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
❤4
Forwarded from Vinayak Bhise
ऐक गं आई,
मला नवरा नको गं,
घरातल्या भिंतींमध्ये कैद
करणारा नको गं

मला आयुष्याचा जोडीदार हवाय,
जो सुख-दुःखाच्या वाटेवर
सोबत चालेल, हात धरून उभा राहील.

लग्नाच्या नावानं अजूनही
मुलींना विकलं जातं,
हुंड्याच्या नादानं घरं उद्ध्वस्त होतात,
नवरा बनून बाईच्या अंगावर
हक्क गाजवतो, स्वप्नं चिरडतो,
तिचं आयुष्य नरक करतो

मुलगी ही खेळणं नाही,
मुलगी ही रांडबाजारातली वस्तू नाही,
ती जीव आहे, स्वप्नं आहे,
घरची लक्ष्मी आहे

“ज्या नवर्यानं बाईला गुलाम केलं,
मारहाण करण्यात आली
त्याच्या संसाराचा वाटोळ झाल

आजच्या मुली म्हणतायत,
मला नवरा नको गं आई,
मला जीवनसाथी हवाय

जो सोबत हसेल, सोबत रडेल,
जो माझ्या स्वप्नांना पंख लावेल.
घरं, गाड्या, दागिने नकोत गं आई,
मला प्रेम देणारा,
जिवापाड जपणारा
काळजी करणारा
मान सन्मान देणारा
जिवलग सोबती हवाय

✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
❤11
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
आर्ट कला शाखा :आणि लोकांचा दृष्टीकोन हा माझा लेख नक्की वाचा 👍👍👍❤️
❤4
Forwarded from Vinayak Bhise
ऐका रे भ्रष्टाचाऱ्यांनो,
जनतेच्या घामावर
राजवाडे बांधणाऱ्यांनो
भ्रष्टाचार थांबवा रे हरामखोरांनो,
नाहीतर भारताची अवस्था
नेपाळसारखी उध्वस्त होईल

शेतकरी आत्महत्या करतोय,
बेरोजगार रस्त्यावर पसरलाय,
रुग्णालयात ना बेड, ना औषधं,
आणि तुम्ही साले साहेब लोक
खिशात लाखोंच्या नोटा भरून
माजोरडेपणानं हिंडता"

"अरे कुत्र्याच्या जातीच्या नेत्यांनो,
संसदेत खोटं बोलता,
गावोगाव दारूचा व्यापार वाढवता,
गरीबांच्या लेकराला ना कामधंदा,
ना शिक्षण, ना नोकरी, ना न्याय
मग तुमच्यासाठी संसद नाही
थेट कत्तलखाना हवा"

"भ्रष्टाचार हा नरपिशाच्च आहे
तो जर संपवला नाही,
तर जनता उठून
तुमची कातडी सोलून
ढोलावर ताणले पाहिजे

"आज जनतेचा संयम संपलाय,
गावोगावची गर्दी रागीट झालीये,
गरीबांच्या डोळ्यातला अश्रू
आज धगधगती आग झालाय,
आणि त्या आगीत
तुमची सोन्याची खुर्ची,
तुमचे सत्तेचे राजवाडे
राख होणार"

"ऐका रे भ्रष्टाचाऱ्यांनो
आज जनता फसली जातेय,
पण उद्या हीच जनता
तुमच्या गळ्याला फास घालेल.
इतिहासात लिहील जाईल
‘भ्रष्टाचाऱ्यांना जनता
भर चौकात ओढून आणते,
मारते, कत्तल करते’"

✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143

#मराठी_कविता, #विद्रोही_कविता #अण्णाभाऊ_साठे, #लोकशाहीर, #मराठी_कवी, #विद्रोही_साहित्य, #NamdeoDhasal, #मराठी_साहित्य
❤5
Forwarded from ओम sm शेळके
आजारी पडलेल्या शरीराला बरं करायला बाजारात औषधं मिळत मात्र थकलेल्या मनाला ऊर्जा द्यायला आयुष्यात एक तरी ध्येय असावं लागतं तरचं आपलं जगणं मस्त होते नाही तर आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरतं नाही म्हणूनचं जीवनात थोडी जरी मजा पाहिजे असेल तर योग्य दिशा शोधावी लागेल तरचं हरलेल्या मनाला जिंकण्यासाठी प्रेरणा मिळेल,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
❤1
Forwarded from ओम sm शेळके
निसर्ग आपल्याला खूप काही शिकवण असतो चांगल्या स्थितीत स्वतःला कसं मजबूत करायचं हे पण आणि वाईट परिस्थिती निर्माण झाल्यावर तिला कसं तोंडं द्यायचं हे पण मुळात माणसामध्ये पण निसर्गासारखीच दानत असावी भरभरून देण्याची घेण्याची नाही कारण निसर्ग जे काही आपल्याला निस्वार्थी पद्धतीने देतो त्याच मोल हे भवतीक जग कुठल्याच गोष्टीने चुकवू शकतं नाही💯☝🏻बरोबर ना!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
❤3
Forwarded from Vinayak Bhise
ऐका रे आळशी गाढवांनो,
तुमचं आयुष्य उठवायला मी आलोय

आळस, कंटाळा, कामचुकारपणा,
झोप, आराम…
हे साले तुझे दोस्त नाहीत,
हे तुझे खुनी आहेत रे
जे तुझ्या छातीवर बसून
तुझं भविष्य गाडतायत.

मोबाईलच्या पडद्यावर
बोटं घासून वीर झालात,
गेम, reels, सोशल मीडिया
बसवलंय डोक्यात
आई-वडील शेतात कंबर मोडून
रक्त घाम गाळतात,
आणि तुम्ही?
झोपेच्या उशाखाली
भविष्य पुरून टाकलंत

रे नालायकांनो,
जो मेहनतीला टाळतो
तो स्वतःच्या घराचा रावण बनतो,
जो आळसाच्या गादीवर लोळतो,
तो स्वतःच्या आयुष्याला राख करतो

कामगार घामाने समाज उभा करतो,
मजूर हाताने देश उभा करतो,
शेतकरी कणाकणाने पोट भरतो…
आणि तुम्ही?
साला पोरांनो,
तुमच्या आळशीपणामुळेच
देश मागे जातो

उठ रे गाढवा,
कष्टाच्या रणांगणात उडी मार,
घामाच्या धारेला तलवार कर,
नाहीतर लक्षात ठेव
आळस, कंटाळा, आराम, झोप
हेच तुझ्या आयुष्याचे खूनखोर आहेत!

✍️ विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ

#विद्रोही_कविता #अण्णाभाऊ_साठे #विद्रोही_साहित्य #NamdeoDhasal #मराठी_साहित्य #बदल_घडवणारी_कविता. #कवितेचा_आवाज #दलित_साहित्य #विद्रोही_कवी
❤6👍1
Forwarded from ओम sm शेळके
आपण दुसऱ्याला हमखास फसवू शकतो मात्र स्वतःला कधीच नाही कारण जग तुमचं बाह्य रूप पाहून फक्त अंदाज लावू शकत पण आपण स्वतः कसे आहोत हे फक्त आपल्याला चांगलच माहिती असतं बाकी आपलं मन छान असलं की सर्व काही योग्यचं दिसू लागतं तसं पण  जी व्यक्ती स्वतःशी प्रामाणिक असते ते कधीच कोणाला फसवू शकतं नाही राव💯खरं आहे ना??,,,✍🏻

एकमन#लेखक

@Ommshelke
❤5
Forwarded from ओम sm शेळके
काही दिवसापूर्वी तू मला अनज्यानं होती मात्र आता असं वाटतं की मला तुझ्या इतकं कोणी समजून घेऊ शकणार नाही हे मी तिला खूश करण्यासाठी लिहत नाही आहे कारण ती स्वतःमध्ये ती इतकी खुश राहते की तिला जगाचं काही घेणं देणं नसते मात्र माझ्या प्रत्येक प्रश्नाला ती एक Google बनून उत्तर देत असते मला माहिती नाही राव तिला माझं वागणं आवडत की नाही पण मी हक्कांने सांगू शकतो की अशी बेस्ट मैत्रीण भेटायला साथ जन्माचं भाग्य लागते💗🙏🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
❤3
Forwarded from B K
वेळ काढून नक्की वाचा..✍"मराठवाडा मुक्तीसंग्राम" काय शिकवतो?
आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या इतिहास हा कोणी लुंग्यासुंग्या ने घडवलेले नाही..हा इतिहास घडवलाय इथल्या कष्टकरी राष्ट्रप्रेमी असणाऱ्या जनतेने आणि त्यांच्या रक्तांच्या थेंबाथेबाने...काय शिकवले मराठवाडा मुक्तीसंग्रमाचा मातीने?हा लढा अन्याय विरोध आवाज उठायला शिकवतो,राष्ट्रासाठी त्याग करायला शिकवतो,सामान्य माणसांनी ताकद शिकवतो.मातीच्या रक्षणासाठी अनेकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली,तेव्हा कुठे सुखाचे हे दिवस पाह्यला मिळाले.आज आपण राष्ट्रीय सण आली की स्टेटस ठेवतोय पण हा लढ्याचा इतिहास काय,आपल्याला काय शिकवतो?ह्यामध्ये अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे स्मरण आपण नेहमी करतो का हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले का?जो लढा पूर्वजांनी दिलाय त्याची जनजागृती करणे गरजेचे आहे.
    भारताला स्वतंत्र मिळूनही मराठवाडा हा प्रांत निजामाच्या पारतंत्र्यात होता..देशाला स्वतंत्र मिळूनही मराठवाडा आणि हैद्राबाद संस्थान भारतात सामील नव्हते,ह्याचे कारण हैद्राबादच्या निजाम हा स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत होता पण ह्या निर्णयाला तेथील सामान्य जनतेचा विरोध होता कारण तेथील शासनाने एक "रझाकार" संघटना तयार केली होती,त्याचा प्रमुख सेनापती होता काशीम रझवी हा अतिशय क्रूर होता.ह्या संघटनेने सामान्य शेतकरी,महिला,बालक ह्यांना खूप त्रास दिला.सत्तीने धर्म बदलण्यास,भाषा शिकण्यास भाग पाडले परिणामी जनता ह्या त्रासाला कंटाळली आणि निजामाच्या त्रासातून मुक्त होण्याची मागणी करू लागली..
  अनेक ठिकाणी आंदोलने होऊ लागले,रक्ताचे सडे वाहू लागले,नेतृत्व स्वा.रामानंद तीर्थ,शंकरसिंग नाईक,गोविंद श्रॉफ अशा अनेक नेत्यांनी पार पाडले.संग्रामात स्वंयसेवकना शस्त्र पुरवले जाऊ लागले.ह्या लढ्यामध्ये अनेक महिलांचाही सहभाग होता.मराठवाड्याच्या राणी लक्ष्मीबाई दगडाबाई शेळके,सिंधू पाठक आदी अनेक महिलांचा सक्रिय सहभाग होता ह्या सर्वांच्या रूपाने स्वातंत्र्य संग्राम लढला गेला🇮🇳.ह्या क्रांतीला शासनाकडूनही मदत होयला लागली.तत्कालीन भारताचे गृहमंत्री सरदार पटेल ह्यांनी ह्या चळवळीचे सूत्रे हातात घेऊन लष्करी कार्यवाही केली,त्यासाठी 'ऑपरेशन पोलो' राबवले.शेवटी कोणताच मार्ग दिसत नव्हता म्हणून 109 तासानंतर अखेर निजामाने शरणागती पत्करताली आणि अखेर मराठवाडा त्रासातून मुक्त झाला..हा स्वातंत्र्याचा प्रवास दिसतो तसा सोपा नव्हता अनेकांनी ह्यात जीव ओतला तेव्हा कुठे आज आपण ह्या मातीत घट्ट पाये रोवून उभा आहोत👍..सर्वांचा त्यागाला सलाम..व्यर्थ न जावे त्यांचे बलिदान..मराठवाडा मुक्तीसंग्राम हा एक दिवसापुरता लढा नाही आहे..हा लढा दररोज आपल्याला अन्याला विरोध, लढायला शिकवतो..जय हिंद🇮🇳
........🦋🌺😇💞.......
शब्दांकन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id-
@Bskendre5
Cont-
7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा
👍2❤1
Forwarded from ओम sm शेळके
हल्ली ना माणसांची ओळख त्याच्याकडे असलेल्या पैशातून होते ना की तो करत असलेल्या कर्मातून  हीच आजच्या समाजाची खूप मोठी शोंवकांतिका आहे ते प्रत्येकाला मान्य करावीचं लागणार आहे कारण लोकं सुखी असण्यासाठी नाही तर आम्ही खूप सुखी आहोत हे दुसऱ्याला दाखवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे मात्र हे विसरून जात आहे की मानसिक समाधान मनाला सुखं देऊ शकत मात्र भवतीक सुखं अंतर्मनाला सुखी नाही ठेवू शकत म्हणून जे आहे त्यात सुख मानलं की ते आपल्याकडे नाही याचं दुःख कधी होत नाही💯,,✍🏻

एकमन#लेखक

@Ommshelke
❤5👍1
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नक्की पूर्ण वाचा..✍️कोणत्याही बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी लागते हे नंदुरबारच्या जिल्हाधिकारी(IAS) मॅडम ह्यांनी स्वतःच्या दोन जुळ्या मुलांचा खेडेगावातील अंगणवाडीच्या शाळेत प्रवेश घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला मॅडमच्या ह्या निर्णयामुळे सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल होऊन सकारात्मक परिणाम दिसतील अशी अपेक्षा आहे.कोणतेही शिक्षण असो ते अतंत्य महत्वाच..मग ते जिल्हापरिषदेच्या शाळेतून मिळो की महागड्या शाळेतून.अभ्यासक्रम व शिक्षण एकच असणार आता ह्या शाळांकडेही परत येणे गरजेचे आहे😇कारण ह्या शाळेत फक्त अभ्यासक्रम शिकवला जात नाहीतर सगळ्या गरीब श्रीमंताच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन राष्ट्रप्रेम,शिस्त,समता आणि स्वतःच्या पायांवर उभे राहण्याची कला शिकवली जाते🙏🏻मान्य आहे इतर शाळांपेक्षा ह्या सुखसुविधा किंवा आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता असेल पण ह्या शाळांना प्राधान्य दिल्यास नक्की बदल घडतील👍🏻
........🦋🌺😇💞.......
लेखन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id-
@Bskendre5
Cont-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा
👍4❤2🤣2
Forwarded from ओम sm शेळके
वयाचं काय ते वाढच राहणार आहे राव पण आपल्या मनाला थोडं नादानचं ठेवायला हवं कारण ते जास्तच समजुतदार झालं की स्वतःसाठी जगणे विसराव लागतं म्हणूनच झाल्या गेलेल्या गोष्टींवर विचार करण्यापेक्षा येण्याऱ्या प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद लुटुन घ्या फक्त त्या आनंदाचा त्रास दुसऱ्यांना होता कामानाही याची काळजी घ्या आणि स्वतःमध्ये इतकं खूश राहा की दुसऱ्याला त्यांच दुःख विसरून आपल्याकडे बघून प्रसन्न वाटलं पाहिजे,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नक्की पूर्ण वाचा.✍️क्षेत्र कोणतेही असो,भारत की नारी सबसे भारी..🔥ही भारताची नारी आहे,ही आपल्या देशाच्या स्वाभिमानासाठी लढू शकते पण कधीच हार मान्य करणार नाही..🤟🏻 राष्ट्रमाता जिजाऊ पासून ते ऑपरेशन सिंधुर🇮🇳मधील सक्रीय सहभाग घेतल्याला आजच्या पिढीतील स्त्रीयांनी जगाला दाखवून दिले आहे ही इथिल स्त्रीने ठरवलं तर ती काहीही करू शकते💪🏻...वेळप्रसंगी ज्या हाताने ती अन्न बनवते त्याच हातात तलवार घेऊन झाशीची राणी बनू शकते,छ शिवाजी महाराज घडवणारी जिजामाता होऊ शकते,सिंधुताई बनून अनाथांची माय बनू शकते❤‍🔥,चागलं शिक्षण घेऊन मोठी अधिकारी बनू शकते,उत्तम खेळाडू बनू शकते🫡मुक्ताई बनून भावाला साथ देऊ शकते,राधा सारखी बनून कृष्णांचा आयुष्यात आनंद आणू शकते.. तीला कमी समजून तिच्या क्षमता बंदिस्त करू शकत नाही,गरज असते ती फक्त तिच्या पंखांना बळ देण्याची,बाकी ती उंच भरारी घेणारच असते🔥
........🦋🌺😇💞.......
लेखन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id-
@Bskendre5
Cont-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा
❤3👍3
Forwarded from Vinayak Bhise
सखे, तुच दुर्गा,
तुच माझी भाग्यलक्ष्मी,
तुच अन्नपूर्णा, सखे तुच
सदैव माझ्यासोबती

सखे तुच हसू
तूच आनंद
तुच सर्वकाही माझ्यासाठी

सखे, तुझ्याविना
नाही घराला घरपण,
ना आधार, ना आसरा

सखे, तुच अर्धांगिनी,
तुच माझी महालक्ष्मी,
तुच जननी, तुच माता
प्रेमाची अखंड ज्योती

सखे, तुच महाकाली,
तुच रुद्रावतरी संकटहारी,
अंधार हटवणारी,
आणि माझ्या आयुष्याला
प्रकाश देणारी.

सखे, तुच सात जन्मांची सोबती,
सुख-दुःखाची खरी कैवारी
तुच माझ्यासाठी सर्वकाही

✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
❤5