नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नक्की पूर्ण वाचा🙏😇प्रतिक्रिया नक्की कळवू शकता,आवडल्यास नक्की शेयर करा..👍
लेखन /telegram id✍-
@Bskendre5
👍4
Forwarded from B K
✍..नाव पुसणे आणि व कष्टाने कमवणे...✍(नक्की पूर्ण वाचा..)

एक गोष्ट लक्षात असूद्या जेव्हा आपण दैनंदिन जीवनात कोणतेही लिखाण वाचतो आणि ते पुढे शेअर करतो त्या वेळी त्याचे मूळ लिहिणारे कोण आहेत ह्याची पण एकदा दखल घेणे गरजेचे आहे..जर मूळ लिखाणा बाबत copy paste केलेले आहे असे जाणवले किंवा तशी शंका आली असे तर त्याची माहिती मूळ लिहिणाऱ्या व्यक्तीस किंवा admin ला द्यावी..कॉपी पेस्ट करणे,नाव खोडून शेअर करणे हा एक गुन्हा आहेच आणि जे असे copy paste करतात त्यांच्यावर कायदाने कार्यवाहीही होऊ शकते आणि मूळ लेखनाची दखल न घेता पुढे शेअर करणे हेही त्या गुन्हाच एक प्रकारे समर्थनच आहे..म्हणून काळजी घ्यावी सर्व वाचकांनी..कारण ज्याचे कष्ट,बुद्धी विचार त्याचे श्रेय ज्याला त्यालाच मिळाले पाहिजे..
आताच्या Social media च्या युगात आजकाल ज्यांना काहीच येत नाही,काहीच प्रतिभा नाही असे लोक चांगल्या लिखाणाला स्वतःच नाव लावतात स्वतःला प्रतिष्ठित करण्यासाठी मूळ लिहणाऱ्याचे नाव खोडून लिखाण फॉरवर्ड करतात आणि काही अतिशहाणे तर तिथे स्वतःच नाव टाकून शेअर टाकतात हे तर अतिशय लज्जास्पद..नाव cut करून शेअर करायला काहीच वेळ,कष्ट,बुद्धी लागत नाही,परंतु नाव कमवायला,स्वतःच्या बुद्धीने चार शब्द लिह्यालाही साधना,अभ्यास करावा लागतो.काही करायला जमत नसेल तर मग आहे ते लिखाण खात्री करून forward करत चालावे त्यात बदल करायला डोके का लावयाचे?एवढेच डोके लावले स्वतःच्या आत्मपरीक्षणसाठी लावावे तर खूप प्रगती होईल..💯
..............🦋🌺😇💞..............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Stud)
Telegram id-
@Bskendre5
Contact-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता व आवडल्यास शेअर करा..🙏✍
❤7👍2
Forwarded from ओम sm शेळके
सुख सर्वांन समोर व्यक्त करता येत मात्र दुःख शेअर करायला आपलं हक्काचं कोणी असावं लागतं पण हल्ली ना चर्चा तुमच्या दुःखाची होते सुखाची नाही म्हणून आपण आतून किती पण दुःखी असलो तरी बाहेरून सुखी दिसलो पाहिजे राव कारण आता असण्यापेक्षा दिसायला खूप महत्त्व आलाय आहे,,बरोबर ना!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
👍4❤2
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आपण जीवनात येणाऱ्या सर्वांच्या स्वप्नांसाठी,घरचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःच्या इच्छा,अपेक्षा मारून झटत असतो परंतु आपल्यासाठी कोणी नसतं✍️अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जेव्हा माणूस एकदा का आयुष्यात गुंतला की एवढा गुंतून जातो,की त्याला स्वतःच्या इच्छा,अपेक्षा ह्याचे सुद्धा भान राहत नाही..बाहेर स्पर्धेत संघर्षमय जीवन,शिक्षण मग जॉब किंवा नोकरी असेल आणि पुढे घरच्या अनेक जबाबदारी असतील. कधीतरी मग जीवन जगताना असे वाटते की यार ह्या धावपळीत स्वतःसाठी जगायचं राहूनच गेले😞आपण आयुष्यभर इतरांसाठी झटलो,सर्वांना मदत करत गेले,वेळोवेळी मदत केली परंतु अखेरीस शेवटी आपल कोणीच नाही ना घरचे,ना नातेवाईक,ना मित्र आपण आलो तसेच जाणार आहोत..☹️ह्याचा अर्थ असा नाही की आपण ही जबाबदारी पार पाडू नये..परंतु यार ह्या प्रवासात कुठंतरी स्वतःच्या इच्छा,स्वप्न,आवड ह्यांचा आपण त्याग केला😞सतत सर्वांसाठी झटत राहिलो आणि त्यात कुठंतरी मग स्वतःच्या आयुष्यात जगूनही कुठंतरी न जगल्यासारखं वाटत राहते..💯
..............🦋🌺😇💞..............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Stud)
Telegram id-
@Bskendre5
Contact-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता व आवडल्यास शेअर करा..🙏✍
👍8❤2
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
स्पर्धा परीक्षेची तयारी करायला,अभ्यास करायला पुणे,दिल्ली किंवा शहरातच जायला पाहिजे का किंवा महागडी coaching लावली,अभ्यासिका लावली तरच selection होते असे नाही..🔥खेडेगाव असो या कुठंही मनामध्ये जर इच्छा असेल आणि अभ्यासाचे वातावरण बाहेर पेक्षा मनात निर्माण झाले ना तर माणूस काहीही करू शकतो❤‍🔥हे जग सुद्धा बदलू शकतो ही ताकद आहे शिक्षणात.कोणताही अभ्यास असो वाया जात नाही✍️...आणि का नाही होणार यशस्वी मनापासून मेहनत केली तर एका पदासाठी नाही झाले दुर्दैवाने तर नक्की दुसरीकडे कुठं ना कुठ होईल ना selection..🤟🏻बदाम खाऊन अक्कल येत नसते, त्यासाठी परस्थितीवर बदलण्याची अंगात दुर्गम इच्छाशक्ती लागते..💪🏻शेवटी कितीही महागडी coaching लावा,अभ्यासिका लावा,पुस्तके घ्या काहीच उपयोग नाही जोपर्यंत स्वतः ठरवतं नाही* ..🔥🤟🏻
..............🦋🌺😇💞..............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Stud)
Telegram id-
@Bskendre5
Contact-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता व आवडल्यास शेअर करा..🙏✍
❤11
✍️" चांगल्या व्यक्तीने अपमान केला ,
अथवा रागवली तरी चालेल ,
पण त्याला सोडु नका

कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत ,

पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात,

म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा "...

✨ Good Night ✨
❤16👌4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ससा आणि कासवाच्या शर्यती पेक्षा ही कहाणी किती सुंदर आहे की, एकमेकांशी स्पर्धा न करण्यापेक्षा प्रत्येकाला त्याच्या अडचणीच्या प्रसंगी त्याची मदत करणे आजकाल मानसाला खूप गरज आहे. अशा चांगल्या गोष्टी पाहून शिकण्याची आपल्या वृत्तीत बदल घडवून आणण्याची.
🙏😊
❤14🙏3👌3😢1
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नक्की वाचा..✍️ ज्यांनी तुम्हाला तुमचे अस्तित्व नगण्य 🤗 असताना आधार दिला,मदत केली अशा मित्रांना,आईवडिलांना,भाऊ बहिणींना कितीही यशस्वी झाले तरीही विसरू नका कारण त्यांच्या वाईट काळातील कष्टांशिवाय मदतीशिवाय कोणताही सोन्याचे दिवस येऊ शकत नाहीत🥰..कितीही श्रीमंत झाले तरीही विसरू नका कारण त्यांचे कष्ट,मदत पैशात मोजता येत नाही..🥺सर्वांशी डोक्याने वागण्यापेक्षा हृदयाने वागलेले नेहमी चांगलेच असते..कारण आपले लोक ते आपलेच असतात आणि तेच वाईट काळात मदतीला येतात,नाहीतर खोटे आश्वासन देऊन बदलणारे किंवा अत्यंत मदतीच्या वेळी,गरजेच्या वेळी पळ काढणारे,कॉल msg पण मुद्दाम न पाहणारे लोकही ह्याच जगात आहे😞त्यामुळे कोणती माणसे कशी आणि खरच ज्याला तुमची किंमत आहे हे ओळखा आणि आनंदीत समाधानी रहा😇
.........🦋🌺😇💞..........
शब्दांकन✍ -B.S Kendre(Stud)
Telegram id-
@Bskendre5
Contact-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता व आवडल्यास शेअर करा..🙏✍
👍7❤2
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
'श्रावणमास :सृष्टीतला नवनिर्मिती काळ 'हा माझा लेख आज ह्या वर्तमान पत्रात प्रकाशित झाला नक्की वाचा... ❤️
❤1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
खरा लोकशाहीर...
अण्णाभाऊ साठे...
✍️"15ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आपण ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झालो.. पण इथल्या समाज व्यवस्थेने वर्षानुवर्षे इथल्या अस्पृश्य दलित, समाज बांधव कामगार वर्ग हा मात्र इथल्या सामाजिक गुलामीतून मुक्त झाला नव्हता म्हणून 16ऑगस्ट 1947ला मुंबई याठिकाणी 20हजार लोकांचा एक मोर्चा निघाला होता..
"ऐ आझादी झुटीं है!देश की जनता भुखी है..! "
हा जयघोष करतं ह्या आंदोलनाने इथल्या उपेक्षित आणि वंचित समाजाचा आवाज बुलंद केला... आणि ह्या आंदोलनाच नेतृत्व करतं होते ती व्यक्ती म्हणजे ' तुकाराम भाऊराव साठे' उर्फ अण्णाभाऊ साठे लोकशाहीरं, लोकं कलावंत,लेखक, कवी.. समाजवादी आंदोलनाचे नेते म्हणून ते अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत...अश्या अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1ऑगस्ट 1920ला वाटेगाव(वाळवा जि. सांगली याठिकाणी झाला वडील भाऊराव साठे तर आई वालूबाई साठे खरतर हे एक अस्पृश्य समजल्या गेलेल्या मातंग जातीत अण्णाभाऊचा जन्म झाला.. घरची गरिबीमुळे अण्णाभाऊ ला वाटेल ते काम करावं लागलं..कोळसा वेचण्यापासून ते ऑफिस मध्ये झाडू मारण्यापर्यंत मिळेल ते काम करून अण्णाभाऊ साठे यांनी आपली उपजीविका चालवली.. पुढे अण्णाभाऊ साठे यांची दोन लग्न झाली..कोंडाबाई आणि जयवंता अशी त्यांची नाव..
अण्णाभाऊ साठे यांच शिक्षण म्हणजे केवळ दीड दिवसाची शाळा. त्यापुढे एकही वर्ग न शिकलेला हा माणूस इतका मोठा होईल अशी कल्पना सुद्धा कोणी केली नव्हती. त्याकाळी असलेल्या जातीवादामुळे अण्णाभाऊना शिक्षण घेता आलं नाही.. तरीही इतके कमी शिक्षण असून सुद्धा अण्णाभाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या,१३ कथासंग्रह,८ पटकथा,१ प्रवासवर्णन,३ नाटके,१० पोवाडे व १४ लोकनाट्ये आणि १२ उपहासात्मक लेख एवढं भरमसाठ लिखाण करून इथल्या शोषित, पिडीत, वंचित समाजाच्या व्यथा आपल्या लिखाणातून मांडल्या.. 16ऑगस्ट 1947ला जे आंदोलन झाल त्या आंदोलनात एक घोषणा करण्यात आली ती म्हणजे
"ऐ आझादी झुटीं है!देश की जनता भुखी है!"
ही घोषणा खरी होत खरतर 15ऑगस्ट ला देश स्वतंत्र झाला तरी सुद्धा इथला कामगार वर्ग, गरीब वर्ग आजही उच्चवर्णीय वर्ग आणि गिरणी मालकाच्या गुलामीत जीवन जगत आहे.. त्यामुळे अश्या समाजाची मुक्तता होणं आवश्यक आहे.. म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांनी या विरोधात आवाज उठवला.. अण्णाभाऊ साठे यांना दलित साहित्त्याचे जनक मानल्या जाते कारण त्यांच्या इतकी अपार साहित्यसंपदा त्यांनी लिहुन ठेवली..संयुक्त महाराष्ट्राच्या लोकचळीत सुद्धा त्यांच अमूल्य योगदान आहे.. लाल बावठा कलापथक च्या माध्यमातून अण्णा भाऊ नी सामाजिक चळवळ बुलंद केली.. आजच्या काळात खूप शिकलेल्या लोकांना एक साधी कविता लिहता येतं नाही पण अण्णाभाऊ साठे मात्र दीड दिवसाची शाळा शिकून सुद्धा 35कादंबऱ्या लिहू शकले.. अण्णाभाऊ साठे हे इथल्या कष्टकरी कामगार, आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर असलेला इथल्या दलित चळवलीचा बुलंद आवाज मानल्या जातात...
"जग बदललं घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव..!"
असं म्हणत..18जुलै 1969 ला अण्णाभाऊ साठेनी यांच भूमीत आपला देह सोडला.. अश्या ह्या महान लोकशाहीरं अण्णाभाऊ साठेना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...अण्णा भाऊ हे खऱ्या अर्थाने इथल्या उपेक्षित समाजाच प्रेरणा स्थान आहे.. लोकशाहीर अण्णा भाऊ साठेचे विचार इथल्या प्रत्येक माणसाला प्रेरणा देतात आणि नव्याने जगायला शिकवतात.. अश्या महान अण्णा भाऊ ला मानाचा मुजरा.. 🙏
✍️ अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक )
जि. बुलढाणा )
लिखाण दी. 1ऑगस्ट 2025
हा लेख कसा वाटला?याबद्दल प्रतिक्रिया नक्की कळवा..
✍️संपर्क -:8806379959
✍️टेलिग्राम ID -
@ABCs1432
👏4
Forwarded from B K
"साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे"..✍

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचे राष्ट्रासाठी कार्य थोर.
साहित्याच्या माध्यमातून केला दलितांचा मोठा उध्दार..

नशिबाला त्यांच्या परिस्थिती होती लहानपणापासूनच खूप दारिद्र्याची.
पण स्वतःची आवड जपून मान वाढवली साहित्य क्षेत्राची..

मा.अण्णाभाऊ साठे म्हणजे साहित्याची मोठी खाण.
आपल्या कादंबरीतून,पोवाड्यातून व कार्यातून मिळून दिला वंचितांना सन्मान..

त्यांच्या कार्याची महिती शब्दात सांगू शकत नाही एवढी मोठी वीरता.
वंचितांच्या,दलितांच्या हक्कांसाठी जागवली समाजात अस्मिता..

शाळा त्यांनी शिकली फक्त दीड दिवसाची.
परंतु साहित्याच्या माध्यमातून केली प्रगती संबंध समाजाची..

केले त्यांनी चुकीच्या कार्याचे,जातीभेदाचे समाजातुन निर्मूलन.
कामगारांच्या,दलितांच्या प्रश्नांना आवाज देऊन केले सांत्वन..

त्यांच्या कार्याची ओळख आजही सातसमुद्रापार.
अशा थोर साहित्यसम्राट्रास माझा नमस्कार..
.........🦋🌺😇💞..........
शब्दांकन✍ -B.S Kendre(Stud)
Telegram id-
@Bskendre5
Contact-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता व आवडल्यास शेअर करा..🙏✍
❤7
Forwarded from ओम sm शेळके
आयुष्य आहे एक तर हसत जगावे लागत एक तर रडत जगावे लागते जगणं तर आहेस मग हसून का नाही आयुष्यात काही समस्या अश्या असतात की त्या सुटता नाहीत त्या तशाच सोडून द्याव्या लागतात तरच प्रत्येक दुःखात सुख शोधता येत नाही तर थोड्या थोड्या गोष्टीचं टेन्शन घेत बसलत आपल्या जगण्यातल हसंच विसरून जावं लागेल राव म्हणून येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला कारण वेळ आजपर्यंत कोणासाठी थांबला नाही!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
❤1
Forwarded from B K
नक्की वेळ काढून पूर्ण वाचा✍..सगळ्यात पवित्र रक्तपालीकडील नाते म्हणजे मैत्री💞..मैत्री असावी निरागस आभाळा सारखी,मैत्री असावी स्पष्ट,पारदर्शक आरश्या सारखी,मैत्री असावी श्रीकृष्ण सुदाम्यासारखी कोणताही भेदभाव नसणारी,मैत्री असावी तर राधा कृष्णासारखी निस्वार्थ स्नेह करणारी🥰मैत्री असावी छ.शिवाजी महाराज व शूर मावळ्यां सारखी जी मृत्यूच्या दारात तुमच्यासोबत उभी राहणारी...मैत्री ही नशिबाने मिळते,जपता आली पाहिजे 🥳
    मैत्री ही असावी नेहमी निस्वार्थी,आधार देणारी,गरजेला मदत करणारी पण आजकालची मैत्रीची व्याख्या बदलत आहे  जसे की फक्त गरज पडल्यास बोलणारी😒आठवण काढणारी..मैत्री ही फक्त स्टेटस पाहण्यापुरती मर्यादित नको,मैत्रीत राजकारण नको🙂‍↕️..डोक्यापेक्षा हृदयाने एकत्र असणारी मैत्री🥰फक्त दिखावा करणारी नसावी,तोंडावर गोड आणि पाठीमागे खोड काढणारी नसावी.चुकेल तिथ हक्काने योग्य दिशाही दाखवणारी..मैत्री कसेही असो,कुणाचेही असो कायम एकनिष्ठ असणारी असावी कारण भविष्यात एक लाख मित्र मिळू शकतात परंतु त्यात तसा कोणी एक नसेल🥰ज्यांनी तुम्हाला वाईट काळात मदत केली होती..मैत्रीत चुका झाल्यास नक्की माफी मागा,कारण खऱ्या मित्रांची किंमत वेळ गेल्यासच कळते✍
.........🦋🌺😇💞..........
शब्दांकन✍ -B.S Kendre(Stud)
Telegram id-
@Bskendre5
Contact-
7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता व आवडल्यास शेअर करा..🙏✍
❤5👌1
Forwarded from ओम sm शेळके
मैत्री हे नातं खरंच खूप ग्रेट असतं कारण तेच फक्त एक निस्वार्थी नातं असतं बाकी सर्व नाते कुठल्या ना कुठल्या स्वार्थासाठी निर्माण होतात आणि स्वार्थापायी संपवून जातात मात्र मैत्री हे एकमेव नातं असं आहे ते आपल्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असतं म्हणून ते तेवढ्याच छान पद्धतीने जपायचं असते 💖🤝💞
Happy friendship day!,,,✍🏻


एकमन#लेखक
@Ommshelke
🥰2
Forwarded from ओम sm शेळके
आपलं मन अश्या व्यक्तीकडे हलकं करा की ते पूर्णपणे तुम्हाला समजून घेऊ शकेल नाही तर तुमच्या जीवनाची व्यथा पुढील व्यक्तीसाठी एक साधी कथा नाही झाली पाहिजे नाही तर आपली वेदना आपल्याच गैरहजेरीत त्यांच्यासाठी मजाकचा विषय होऊ शकतो म्हणून जीवनात अशी एक व्यक्ती जपा ती तुमच्या वेदनेवर शब्दरूपी फुंकर घालायला नेहमीच तयार असेल!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
❤5