Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
13.1K subscribers
1.85K photos
25 videos
361 files
2.8K links
✅ शासकीय योजना

✅ पीकविमा, अनुदान

✅ कुसुम, मुख्यमंत्री सोलर

✅ कर्जमाफी,CSC माहिती
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

https://www.youtube.com/@marathitechmitra?sub_confirmation=1

Affiliate Discloser:https://t.me/marathitechmitra/1644
Download Telegram
#Scam alert
1.Galaxy Recharge
2.Direct4you
3.Pay2earn
4.Apmoneny
4.Moon Telecom

रिचार्ज साठी तुम्ही हे ॲप्लिकेशन वापरत असाल तर हे ॲप्लिकेशन फ्रॉड आहेत. तुमच्या वॉलेट मधून 199 रुपये deduct करतात आणि तिथे कुठले तरी डमी नंबरची एन्ट्री करतात त्यामुळे हे ॲप्लिकेशन वापरत असाल तर वापरू नका.

ज्या ठिकाणी तुम्हाला Early Access दिसेल समजून जा ते fraud आहेत.

यापेक्षा मग खालील एप्लीकेशन युज करा कमिशन कमी आहे परंतु स्कॅम होणार नाही.

1.First App

2.Second App
❤2
📢 निवृत्तीवेतन धारकांसाठी महत्त्वाची अपडेट: ऑक्टोबर २०२६ च्या पेन्शन वाटपात तांत्रिक अडचण!

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या माहे ऑक्टोबर २०२६ च्या लाभाच्या रकमा वितरित करताना महा-डीबीटी (MahaDBT) पोर्टलवर खालील गंभीर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत:

१. खाते क्रमांक अदलाबदल (Account Interchange): महा-डीबीटी पोर्टलवर संजय गांधी निराधार योजनेचे बँक खाते क्रमांक हे श्रावण बाळ योजनेच्या खात्यांवर दिसत असल्याने चुकीच्या खात्यावर रक्कम जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२. XML फाईल डुप्लिकेट जनरेट होणे (Duplicate XML): एकाच लाभार्थ्याची फाईल दोन वेळा जनरेट होत असल्याने, एकाच महिन्यात दोनदा पेन्शन (Double Payment) जमा होण्याची शक्यता आहे.

या तांत्रिक त्रुटींमुळे चुकीचे वाटप किंवा शासकीय निधीचा अपव्यय टाळण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय, पुणे यांनी शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे.

त्यामुळे पेन्शन खात्यात जमा होण्यास थोडा विलंब होऊ शकतो किंवा पडताळणीनंतरच अचूक रक्कम जमा केली जाईल.

📌 माहिती उपयुक्त वाटल्यास गरजू लाभार्थी आणि नागरिकांपर्यंत नक्की शेअर करा!

---

#SanjayGandhiNiradharYojana #ShravanBalYojana #MahaDBT #MaharashtraGovt #PensionUpdate
❤1
मागेल त्याला सोलर कंपनी ॲड झाल्या आहेत.
❤2
Pack of 12 socks 🧦
https://bitli.in/sCD2dWH
❤1
Motorola G57 Power 5G (Regatta, 8GB RAM, 128GB Storage) | Snapdragon 6s Gen 4 Processor | 6.72" FHD+ Display | 50MP LYT-600 + 8MP Ultrawide | 8MP Selfie Camera | 7000mAh Battery, 33W TurboPower | IP64

https://link.amazon/B0i8MgSD5
*मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना बाबत... नवीन प्रेसनोट*

📌 *लवकरच या योजनेचे अर्ज पोर्टल सुरू करण्यात येणार आहेत.*
👍2
भावपूर्ण श्रद्धांजली नटसम्राट
❤8
*नाशिक जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत कृषी साहित्य लाभासाठी
पात्र शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
*

नाशिक जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ करिता शेतकऱ्यांना कृषी उपयोगी साहित्य खरेदीसाठी ५० टक्के अथवा मर्यादित अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत किसान ड्रोन, विद्युत पंपसंच, कडबाकुट्टी यंत्र, ट्रॅक्टर व रोटाव्हेटर आदी साहित्याचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी संबंधित पंचायत समिती येथे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

या योजनेसाठी शेतकऱ्यांचे अर्ज तालुकास्तरावर मागविण्यात येऊन संबंधित तालुक्यांना प्राप्त होणाऱ्या लक्षांकाच्या मर्यादेत प्राप्त अर्जांमधून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. योजनेंतर्गत किसान ड्रोनसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, कृषी पदवीधर शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच आत्मा संस्थेमार्फत नोंदणीकृत शेतकरी गट यांना खरेदी किमतीच्या ५० टक्के किंवा कमाल रु. ३ लाख ५० हजार यापैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल. शेतकऱ्यांना खरेदी किमतीच्या ४० टक्के किंवा कमाल रु. ३ लाख, यापैकी जी कमी असेल ती रक्कम देय राहील.

विद्युत पंपसंच (जलपरी) ५ एच.पी साठी महत्तम अनुदान खरेदी किमतीच्या ५० टक्के अथवा कमाल रु. ८ हजार प्रति नग, यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल. कडबाकुट्टी यंत्रातंर्गत इंजिन अथवा इलेक्ट्रिक मोटरचलित ३ एच.पी.पर्यंत तसेच पॉवर टिलर व ट्रॅक्टरचलित २० बी.एच.पी.पेक्षा कमी क्षमतेच्या यंत्रासाठी खरेदी किमतीच्या ५० टक्के अथवा मर्यादित अनुदान, कमाल रु. २० हजार प्रति नग देण्यात येईल. तसेच ८ ते ७० पी.टी.ओ. एच.पी.पर्यंतच्या ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती-जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला लाभार्थ्यांना खरेदी किमतीच्या ५० टक्के अथवा रु. १ लाख 25 हजार यापैकी कमी असलेली रक्कम व इतर लाभार्थ्यांना खरेदी किमतीच्या ४० टक्के अथवा रु. १ लाख, यापैकी कमी असलेली रक्कम प्रति नग देण्यात येईल.

ट्रॅक्टरचलित २० बी.एच.पी.पर्यंतच्या रोटाव्हेटरसाठी खरेदी किमतीच्या ५० टक्के अथवा जास्तीत जास्त रु. ३६ हजार प्रति नग अनुदान देण्यात येईल. याशिवाय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात मान्यता दिलेल्या अपघात व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी पूरक अनुदान देण्याची योजनाही राबविण्यात येत आहे. यामध्ये अपघातग्रस्त शेतकरी अथवा त्यांच्या कुटुंबाला रु. १० हजार, तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला रु. २५ हजार पूरक अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्जासोबत स्वतःचे नाव असलेले ७/१२ व ८-अ चे अद्ययावत उतारे सादर करणे आवश्यक आहे. किसान ड्रोन अथवा ट्रॅक्टर नसल्याबाबतचे दाखले, तसेच इतर योजनेंतर्गत ड्रोन, ट्रॅक्टरचा लाभ घेतला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक राहील. ड्रोन, ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर त्यांचे कोटेशन जोडणे आवश्यक आहे. तसेच विद्युत पंपासाठी पाण्याचा स्रोत व विद्युत जोडणी असणे आवश्यक आहे. कडबाकुट्टी यंत्रासाठी पाच जनावरे असल्याबाबत पशुधन विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. रोटाव्हेटर खरेदीनंतर त्याचा वापर करण्यासाठी ट्रॅक्टर असल्याचा पुरावा म्हणून आर.सी. बुकची प्रत जोडणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
❤8👍1